Ezekiel 15

यरुशलेम जणू निरुपयोगी द्राक्षलता

1नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला 2मानवाच्या मुला वनवृक्षाची इतर झाडे त्याच्या फांद्या ह्यांच्या तुलनेत द्राक्षाच्या झाडाची काय महतता आहे? 3तिचे लाकुड घेऊन काही तरी करण्याच्या उपयोगास पडते काय? किंवा त्यावर काही लटकवण्यासाठी खुंटी म्हणून उपयोगात आणतात काय? 4बघा जर ती आगेत इंधन म्हणून उपयोगात आणली नाही. तर अग्नीने जाळून भस्म झाल्यावर उपयोगी वस्तु बनवीण्यास कोणत्यास उपयोगात राहात नाही.

5पहा ती चांगली असता कोणत्याच उपयोगाची नाही. जळाल्यावरही कोणत्याही कामाची राहणार नाही. 6प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो की, वनवृक्षातील न आवडती द्राक्षाचे झाड मी आगीने जाळून टाकीन त्याच प्रमाणे यरुशलेम निवासी त्यांच्याशी मी तोच व्यवहार करेल.

7मी माझे मुख त्यांच्या दृष्टीआड करेल, जरी ते आगेतून बचावतील तरी अग्नी त्यास भस्म करेल. मी त्यांच्या दृष्टीआड होईल तेव्हा तुम्हाला समजेल मी परमेश्वर देव आहे. मी देश ओसाड नापीक करेल कारण त्यांची पापकर्मे करीत असे प्रभू परमेश्वर देव म्हणतो.

8

Copyright information for MarULB